पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इटलशी युद्ध पुन्हां त्यांना अडविण्यांत आले. कमाल यांना मोडकेतोडके अरबी येत होते. शिवाय त्यांचे वा डोळ पाहून ते अरब नसावेत असा तेथील अधिका-यांना दाट संशय आला. त्या सरहद्दीवरचा मुख्य अधिकारी एक इजिप्शीयन मुसलमान होता. अलेक्झांडूयाहून तेथील इंग्लीश कमांडर कमाऊ यांच्या चेहरपट्टीचे वर्णन त्याच्याकडे पाठवून दिले होते व कमाल तेथे आल्याबरोबर त्यांना पकडून अलेक्झांड्रीया येथे पाठवावं असे फर्माविले होते. सरहद्दीवरच्या त्या अधिका-यांच्या मनांत इंग्लिश व इटालीयन लोकांबद्दल विलक्षण तिटकारा होता; उलट तुर्की लोकांविषयी त्याच्या मनांत अत्यंत सहानुभूति होती; पण तो हुकुमाचा ताबेदार असल्यामुळे अलेक्झांडीयाहून आलेल्या हुकुमाची अमलबजावणी करणे त्याला भाग होते. त्याने दुस-या एका घारे डोळे असलेल्या गृहस्थास पकडून अलेक्झांड्रीयास पाठवून दिले व कमाल यांना मनापासून आशिर्वाद देऊन त्यांना सरहद्द ओलांडू दिली. कमाल हे ऐनलमनसूर येथे असलेल्या तुर्की छावगींत जावन पोहोचले. त्या ठिकाणी कमालांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यांत आले. अनवर पाशाही त्याठिकाणी अगोदरच येऊन पोहोचले होते. त्यावेळीं इटालीयन सैनिकांनी समुद्र किना-याचा ताबा घेऊन आंत चाल करण्याचा विचार चालविला होता. अनवरपाशा ६३