पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुझी छापाशी इसवीस इटलीने आपले सैन्य ट्रिपोलीमध्ये घुसवून, मुख्य शहराचा व किना-याचा ताबा घेतला. इटलीने अशा रीतीने तुर्कस्थानाविरुद्ध युद्ध पुकारल्याबरोबर कमालांनी राजकारण सोडून दिले व दोन स्नेह्यांबरोबर खप्कीने ते ट्रिपोलीकडे यावयास निघाले. इटालियन लोकांनी समुद्राचा ताबा घेऊन, दानेलिस सामुद्रधुनी बंड करून टाकली त्यामुळे टिपोलीला जाण्याकरितां फक्त एकच मार्ग मोकळा होता आणि तो म्हणजे खुष्कीचा. कमाल आशियामायनरमधून सिरीया व पॅलेस्टाईनमध्ये आले.तेथून ते अलेक्झांड्रिया येथे जाऊन पोहोचलें. इंग्रजांनी इजिप्त तटस्थ असल्याची घोषणा करून सरहद्द बंद करून टाकली. तुर्की लोकांना इजिप्तची सरहद्द बंद झाल्याचे ऐकून कमाल यांना धक्काच बसा. * इजिप्त तुर्कस्थानचा प्रदेश ! त्यामध्ये इंग्रजांना ढवळाढवळ करावयाचे काय कारण ? सरहद्द बंद करून तुकना आपल्या प्रदेशांत जाण्याचा मज्जाव करणे म्हणजे शुध्द अत्याचार आहे ' अशा विचारांनीं कमाल यांचे डोके संतापून गेले; पण त्यावेळी संतापून उपयोग काय ? कसेही करून त्यानां ट्रिपोलीमध्ये जाणे भागच होते. ते तिघे स्नेही निरनिराळ्या मार्गीन गुप्तपणे ट्रिपोलीस जावयास निघाले. कमाल यांनी एका अरब गृहस्थाचा वेष घेतला व पश्चिमेकडे जाणाच्या एका रेल्वेने ते जावयास निघाले. पश्चिम सरहद्दीवर ६ ६१