पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इटलीशी युद्ध मंत्र्याचा हुकूम शिरसावंद्य मानून ते सलानिकास गेले. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना फार फुरसत सांपडू लागली आणि हा फुरसतीचा वेळ ते आपल्या कार्याची नक्की आखणी करण्यांत घालवू लागले. दररोज रात्री कडीकुलपांत गुप्त सभा होऊ लागल्या. आता त्यांना जो विरोध करावयाचा होता तो सुलतानास नसून,राज्यसूत्रे ज्यांच्या हाती आहेत अशी त्यांच्याच संस्थेच्या क्रांतिकारक समजल्या जाणाच्या सभासदांना, करावयाचा होता. ही बातमी युद्धमंत्र्याच्या कानांवर जातांच, त्यांनी कमाल यांना सैन्यामध्ये सरकार विरुद्ध प्रचार करण्याबद्दल दोष दिला. तथापि ऐकीव वार्तेखेरीज तशा प्रकारचा भरीव पुरावा नसल्यामुळे युद्धमंत्र्यांना कांहींच करता येईना. त्यांनी फक्त कमाल यांना सलानिकाहून बदलून कॉन्स्टॅटिनोपल येथील मुख्य कचेरीत आपल्या नजरेखाला आणून ठेविले. कॉन्स्टटिनोपल मध्ये अद्याप शांतता नि सुव्यवस्था झाली नव्हती. मुत्सद्यांमध्ये अधिकाराबद्दल चुरस चालूच होती. दर आठवड्यांस मंत्रिमंडळे बदलत असत. सर्व मुत्सद्यांना काबूत ठेवणारा असा महान् पुढारी कोणीच नसल्यामुळे सुव्यवस्थेची घडी अद्याप बसली नव्हती. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन आक्टोबर १९११