पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कुमालपाशी मिळाले म्हणून बहुजनसमाजाच्या हातात सत्ता आली असे होत नाहीं. आपल्या देशांत क्रांति झाली असे आपण म्हणतो; पण परिस्थितीकडे लक्ष्य देता ती क्रांति नसून, क्रांतीचे विडंबन आहे असेच म्हटले पाहिजे. तरी कांहीं निश्चित कार्यक्रम आंखल्याखेरीज आपल्या मातृदेशाची धडगत नाही हे प्रत्येक तुकीने ओळखले पाहिजे." । मुस्तफा कमाल यांचे वरील तर्कशुद्ध विचार लष्करांतील अधिका-यांना पटू लागले व ते अधिकाधिक प्रमाणांत त्यांच्या भोवती गोळा होऊ लागले. पहिल्या दर्जाचा लष्करी अमलदार या या दृष्टीने लष्करी अधिका-यांच्या मनांत कमाल यांच्या विषयी आदर होताच; त्यांत कमाल यांना आपल्या राष्ट्राच्या कल्याणाविषय लागलेली तळमळ पाहून तर त्यांच्यावर आधिकच भक्ति बसली. कमाल यांच्या स्पष्ट व राष्ट्रप्रेमी विचारामुळे ते नवजवान तरुणांचे पुढारी व नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. कमाल यांची जहाल विचारसरणी पाहून असा मनुष्य राजधानीच्या ठिकाणी ठेवणे धोक्याचे आहे हे युद्धमंत्री महामूद शौकत पाशा यांनी ओळखले व त्यांची सलानिकास ३७ व्या घोडदलाचे आफिसर कमांडिंग ह्मणून बदली केली. या अनपेक्षित बदलीबद्दल कमाल यांनी काडीमात्र विरोध दर्शविला नाहीं. युद्ध ६०