पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८ वें -X- इटलीशी युद्ध 453

  • युरोपांतील राष्ट्रे दिवसेंदिवस अधाशी बनत आहेत आणि अभागी तुर्कस्थानला केव्हां गट्ट करूं याची ती वाट पहात आहेत. * संघ आणि अगति ' या संस्थेच्या हातांत राज्यकारभार आल्याबरोबर संस्थेचा पुढारी जवीद याने विश्वासघाताने बगदाद रेल्वे जर्मन लोकांना विकून टाकली. जर्मन मुत्सद्यानी तर आमच्या राजधानीत तळच टाकला आहे. परकीयांवर विसंबून न राहतां, तुर्कस्थानने स्वतः राज्यकारभार करण्याची हिम्मत बाळगली पाहिजे. आपल्या मातृदेशांतील परिस्थिती आहे तशीच आहे. पूर्वीच्या राजवटींत काडीचाही फरक नाही. पूर्वीसारखं आतांही दारिद्य आहे, पूर्वीसारखें तांही असमाधान आहे, पूर्वीसारखा आतांही सैन्यामध्ये असंतोष आहे. तेव्हां वाटेल ते करून हे सर्व सुधारलेच पाहिजे. मुठभर चळवळ्या लोकांना राजकारणांत स्थान