पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A: ।।। गामी कमालपाशा. लष्करी अधिकारीवर्गाच्या शाळेची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी शाळेची नवीन पद्धतीवर पुनर्घटना केली. परिसहून परत आल्यानंतर त्यांचे मन सारखे राजकारणाकडे धांव घेऊ लागले. आपल्या राष्ट्राच्या कमकुवत राजकारणाबद्दल त्यांना तिटकारा वाटू लागला, ६ क्रांति झाली, क्रांति झाली म्हणून म्हणतात; पण त्या क्रांतीचा राष्ट्राला काय फायदा झाला ? राष्ट्राची काय प्रगती झाली ? जनतेचे काय कल्याण झाले ? अनवर, तलात, आणि जमाल हे संस्थेचे पुढारी आज राजकर्ते झाले एवढा एकच फायदा क्रांतीमुळे झाला, असे फार तर म्हणता येईल; पण राज्यधुरा वाहण्याइतकी त्यांची योग्यता अहे काय ? राष्ट्राचे कल्याण करण्याची त्यांना तळमळ आहे काय ? एकाच्या खांद्यावरून दुस-याच्या खांद्यावर राज्यधुरा गेली. फक्त खांदा बदलला पण राज्यकारभार सुधारला काय ? अशा त-हेचे विचार कमाल स्पष्टपणे शाळेतील अधिका-यां- समोर मांडीत; इतकेच नव्हे तर समाजामध्ये देखील ते बिनदिक्कत बोलून दाखवीत. > ५८