पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतीचा अवेळी स्फोट खबरदारी घेतली. कमाल यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना शंका नव्हती; पण उठल्यासुटल्या कडक टीका करण्याची त्यांची वृत्ती त्या पुढा-यांना आवडत नव्हती. या टिकाकारास अशा समय मागे रेटणे हेच योग्य समजून, त्यांनी कमाल यांना राजकारणात पुढे येऊ दिले नाहीं. नंतर कमाल यांची मॅसोडोनिया येथील सैन्याचे प्रमुख अधिकारी म्हणून नेमणूक झाली. यावेळी त्यांचे वय ३० वर्षांचे होते. मॅसोडोनियामध्ये परत आल्यानंतर, त्यांनी लष्करीशास्त्राचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला. लष्करी सामर्थ्याची वाढ कशी होईल या विचारांत त्यांनी कित्येक दिवस घालविले. लष्करी खात्यांतील त्यांची प्रगती व हुशारी पाहून त्यांना सन १९१० साली जनरल अली रझा यांच्याबरोबर फ्रान्समध्ये लष्करी कामगिरीवर पाठविण्यात आले. परिसला गेल्यानंतर त्यांनी तेथील परिस्थिती काळजीपूर्वक न्याहाळली. ज्या कामगिरीवर कमाल यांची नेमणूक झाली होती ती कामगिरी अपेक्षेबाहेर यशस्वी झाली; त्याबद्दल जनरल अली रझांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली. पॅरिसहून परत आल्यानंतर कमाल यांची सलानिकामधील लष्करी अधिका-यांच्या शाळेवर नेमणूक झाली. 4)