पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा गेला; इतक्यांत कमाल हे ट्रिपोलीहून तेथे आले. त्यांनी व सर्वे तरुण अंमलदारांनी महमूद शौकत पाशास संस्थेच्या सभासदांच्या मदतीस जाण्यास भाग पाडले. या अंतस्थ बंडाळीची हकीकत ऐकून अनवरपाशा बर्लीहून ताबडतोब निघून ते * संघ आणि प्रगती' या संस्थेच्या बचावार्थ सज्ज झालेल्या सैन्यास मिळाले. या सैन्याच्या घोडदळाचा ताबा अनवर पाशांनी घेतला व स्टाफचे सर्वाधिकारत्व कमाल यांनी पत्कारलें. अनरपाशा व कमाल हे सैन्यासह राजधानीवर चाल करून गेले व राजधानीचा कबजा घेतला. त्यांनी अंतस्थ बंडाळी मोडून टाकली, मुल्ला मौलवींना पिटाळून लावले, संस्थेच्या सभासदांना तुरुंगातून सोडविले व सुलतानाला कैद करून त्याच्या वयस्क व वृद्ध पुतण्याला गादीवर बसविले. संकटात सापडलेली व राज्यसूत्रे नक्तीच हाती घेतलेली ' संघ आणि प्रगति' ही पुन्हा एकवार जोरदार व भावी संस्था बनली. या विजयामुळे अनवरपाशांचा सर्वच जयजयकार सुरू झाला. कमाल यांचाही विजयामधे मोठा हिस्सा होता. पण त्यांच्या प्रसिद्धीविन्मुख स्वभावामुळे ते जनतेपुढे येऊ शकले नाहीत. संस्थेच्या इतर पुढा-यांनीही त्यांचे नांव पुढे येऊं नये म्हणून ५६