पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतीचा अवेळीं स्फोट असल्यामुळे मुल्लामौलवींनी मोठ्या आवेशाने लोकांची मर्ने बियरविण्याचे कार्य सुरू केले. | या चेतावणीमुळे तुर्की जनता खवळून गेली; इतकेच नव्हे तर, तुक लष्करावर ही तिचा विलक्षण परिणाम झाला. सैनिकांनी बंड पुकारून आपल्या नवमतवादी व सुधारणावादी अधिका-यांना ठार मारले; पुढा-यांना चेचून काढले. * इस्लाम हा आपला धर्म असून सुलतान हा आपला खलीफा आहे; आपण आपल्या धर्माशीं व खलिपाशी इमाने इतबारे राहूं,' अशी घोषणा करून, त्यांनी तुर्कस्थानची राजधानी आपल्या कबजांत घेतली व * संघ आणि प्रगतीच्या ' सभासदांचे दिवसाढवळ्या खून पाडण्यास सुरवात केली. संस्थेच्या सभासदांनी मॅसेडोनियामधील सैन्यास आपल्या मदतकतां पाचारण केले. या सैन्यावर मुल्लामौलवींच्या प्रचाराचा अद्याप परिणाम झाला नव्हता. ' आपण आमच्या मदतीला आलांत तरच आमची धडगत आहे नाही तर पुन्हा सुलतानाची जुलमी राज्यव्यवस्था सुरू होईल असा त्यांनी निरोप पाठविला. या सैन्याचा प्रमुख अधिकारी महामूद शौकतपाशा, हा सुलतानाच्या कृपेतील मनुष्य होता. पण त्याच्या हाताखालील सर्व अंमलदार संस्थेचे सभासद होते. काय करावे असा त्याला पेच पडून तो गोंधळून ५५