पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गासी कमालपाशी त्यांची धडपड सुरू झाली. बंड पुकारणारे पुढारी नियाझी यांची अल्बेनियामध्ये मोठ्या हुद्यावर नेमणूक झाली; पण त्याठिकाणी त्यांचा खून झाला. अनवरपाशांना बळुन येथे नेमण्यांत आले. कमाल यांना उत्तर आफ्रीकेंतील ट्रिपोली येथे लष्करी छावण्यांची पाहाणी करण्याकरितां पाठविण्यांत आले. | तुर्कस्थानमध्ये झालेल्या राजक्रांतीचा कमकुवतपणा पाहून आस्ट्रीयाने बोस्नियाचा आणि ग्रीसने क्रीटचा कबजा घेतला. रशियाच्या चिथावणीवरून बल्गेरियाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले, साम्राज्यामध्ये ठिकठिकाणी बंडाचे निशाण फडकू लागले. अल्बेनिया व अरबस्थानमध्येही बंडाचा पुकारा झाला. ही बिघडलेली परिस्थिती पाहून सुलतानाच्या अभिमानी लोकांनी सुलताचे स्थान पूर्वीप्रमाणे स्थिर करण्याचा जोराचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी धर्मवेड्या मुलामौलवींना सर्व देशभर पाठवून दिले. * बंड करून ज्यांनी नवीन राज्यघटना घडवून आणली ते तरुण लोक धर्मशत्रू आहेत; त्यांना धर्माबद्दल आस्था किंवा अभिमान नाहीं; ते धमार्ने निषिद्ध मानलेल्या सुधारणा करणार आहेत; ते सच्चे मुसलमान नसून इस्लाम आणि खिलापत यांचा नाश करण्याचा त्यांचा बेत आहे, अशा त-हेचा जहरी प्रचार मुल्लाभौलवींनीं सुखं केला. मुल्लामौलवींचे व तरुण तुर्कचे खडाष्टक ५४.