पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतीचा अवेळ स्फोट तशी सुलतानाची सत्ता बघता बघता निघून गेली. सबंध तुर्कस्थान आश्चर्याने आ वासून राहिला. सुलतानाने बांका प्रसंग ओळखला व ताबडतोब जबाबदार राजपद्धतीची घोषणा केली; आपल्या अधिका-यांना राजकारभारांतील गैरव्यवस्थेबद्दल दोष दिला आणि गुप्त हेराचे खाते बंद करून टाकले. अशारीतीने बंडखोरांच्या मागण्या सुलतानाने मान्य केल्या. तुर्की लोकांचे थवेच्याथवे बंडखोरांच्या स्वागतार्थ जमू लागले. सानिकामध्ये तर एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण पसरले होते. तेथील एका प्रसिद्ध चौकांत असलेल्या पैलेस हॉटेलच्या सज्यांत उभे राहून बंडखोरांचे पुढारी अनवर यांनी नवीन राज्यघटनेचा पुकारा केला. त्यांच्यामागे * संघ आणि प्रगतीचे सर्व सभासद उभे होते. कमाल हेही संस्थेचे सभासद असल्यामुळे त्या सभासदांत उभे होते. पण प्रचंड जनसमुदायाची दृष्टी अनवरपाशांवर खिळल्यामुळे कमाल यांच्याकडे कुणाचेही लक्ष्य गेलें नाहीं. नवीन राज्यघटना अमलांत आल्याबरोबर, तुर्कस्थानमधून इतर देशांत दद्दपार झालेले अनेक मुत्सद्दी भराभर तुर्कस्थानमध्ये येऊ लागले. त्यांनी ' संघ आणि प्रगती'ची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. नवीन राज्यघटनेमध्ये मानाची जागा मिळविण्याची