पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालप३।। पण ती क्रांति किंवा ते बंड, परिस्थिती न्याहाळून किंवा अभ्यासून पुकारलेले हवे होते. या दोन पुढा-यांनी केलेल्या अवेळीं धाडसाबद्दल कमाल यांना अत्यंत वाईट वाटले. यदाकदाचित् हा बंडाचा प्रयोग फसला तर क्रांतीची पाळेमुळे खणून निघाल्याखेरीज राहणार नाहींत या विचाराने त्यांचे मस्तक सुन्न झाले. ज्या क्रांतीचा आपण अहोरात्र ध्यास घेऊन बसलो आहोत, ती क्रांति गर्भावस्थेतच ठार होणार या विचाराने त्यांना अतिशय दुःख झाले. पुन्हां तोच सुलतान, तीच नादान राजवटी, तेच लांचखाऊ अधिकारी, तोच जर्जर झालेला तुर्कस्थान त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागला. पण अत्यंत अश्चर्याची गोष्ट म्हणजे ते बंड यशस्वी झाले. डोंगरांत लपून राहिलेल्या शंभर दोनों बंडखोरांना पकडण्यास गेलेले सुलतानाचे सैन्य, बंडखोरांच्या सुदैवाने, त्यांना फितूर झाले. सुलतानाने दुसरे सैन्य पाठविले, त्याचीही तीच अवस्था ! अनेक तुकड्या पाठविण्यांत आल्या; पण त्या सर्व बंडखोरांना फितूर झाल्या. शेवटी राजधानीमधून खास सैन्य पाठविण्यांत आले; पण तेही फितूर झाले. विचाच्या सैनिकांना कित्येक महीन पगार नव्हता किंवा त्यांची नीट व्यवस्था नव्हती; त्यामुळे ते बंडखोरांना फितूर झाले यांत नवल ते काय ? वाच्यापुढे जसा पाचोळा उडून जातो, ६६ ।