पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७३ -XX क्रांतीचा अवेळी स्फोट ५६० च तुर्कस्थानमधील नवजवान तरूण ज्या क्रांतीची वाट पहात होते, त्या क्रांतीचा स्फोट अकल्पित व अवेळी झाला. * संघ आणि प्रगतीच्या एका पुढा-याने मागचा पुढचा विचार न करतां कांहीं तरुणांना जमा केले व मसोडोनियाच्या डोंगराळ प्रदेशांत जाऊन त्याने सुलतानाविरुरू बंड पुकारले. अनवर नांवाच्या दुस-या पुढा-याने पूर्व भसोडोनियांत तशीच बंडाळी सुरू केली. बंड पुकारण्यापूर्वी या दोन पुढा-यांनी जनतेची कितपत तयारी आहे याचा अंदाजही घेतला नव्हता किंवा इतर पुढा-यांशी बाटाघाटही केली नव्हती. | या चमत्कारिक परिस्थतीकडे लक्ष देत कमाल स्वस्थ बसले होते. तयारी नसतांना पुकारलेल्या बंडांत भाग घेण्याइतके ते उतावळे नव्हते. त्यांना बंड हवे होते, त्यांना क्रांति हवी होती;