पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी कमालपाशा नाहीं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव की हातांत जे कार्य घेतलें आहेस त्याचा शेवट कसाही कटू होवो, ते सोडता कामा नये. तुला विजय हा मिळालाच पाहिजे. विजय मिळविण्याकरिता मानवी प्रयत्नांची शिकस्त कर. तुला माझा आशिर्वाद आहे.” आईचा आशिर्वाद मिळाल्यामुळे, कमाल दुप्पट उत्साहाने आपल्या कार्यास लागले. दिवसभर आपली लष्करी नोकरी ते कसोशीनें व उमेदीने करीत. संध्याकाळ झाली की, आपल्या खोलींत क्रांतिकारक स्नेही जमा करीत. कुणालाही सुगावा लागू नये ह्मणून दारांना कडीकुलूप घालीत; इतकेच नव्हे तर खिडक्या देखील बंद करीत. क्रांति कशी करावी व केव्हा करावी याबद्दल रात्रभर चर्चा चाले. याखेरीज ' संघ आणि प्रगती' या संस्थेच्या सर्व सभांना ते हजर असत. अद्याप त्या संस्थेच्या पुढा-यांनी आपल्या अंतर्गत वर्तुळांत त्यांना घेतले नव्हते. कमाल यांना ही परिस्थिती सहन होईना. आपल्या हाती सर्व सूत्रे आली पाहिजेत किंवा अपण अगदी अलिप्त तरी राहिले पाहिजे असे विचार त्यांच्या डोक्यांत भ्रमण करू लागले. I