पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतीचा ध्यास

  • तू म्हणतेस तशा प्रकारचे सामर्थ्य व सत्व सुलतानांच्या अंगी असते, तर त्यांच्या विरुद्ध बंड करण्याची आवश्यकताच होती कुठे ! आई, तुझा सुलतान हा पूर्वीच्या सुलतानांसारखा नाहीं. तो अगदी शक्तिहीन व निःसत्व झाला आहे. त्याच्या हातून आपल्या राष्ट्राची सोडवणूक केली पाहिजे. त्याची हाती राष्ट्राची सूत्रे ठेवणे म्हणजे राष्ट्राचा सत्यानास करणे होय ! आई, तुला कदाचित माझे म्हणणे पटणार नाहीं; पण माझ्या स्वीकृत कायत तू अडथळा आणणार नाहींस अशी मला खात्री आहे ?

44 पण, तुला या कार्यात यश मिळेल असे मला वाटत नाहीं. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. तुला हातची घालवावयाला मी तयार नाही. या कार्याचा शेवट किती भयंकर होईल याची कल्पना देखील मला सहन होत नाही." | मी प्राण गेला तरी माझ्या कार्यापासून च्युत होणार नाहीं. मी ते कार्य करण्याची प्रतिज्ञा केली आहे. आई मी केलेली प्रतिज्ञा मोडावी असे तुला वाटते कां ? " ५ नाहीं ! ” जुबेदा निश्चयाने ह्मणाल्या..

  • बटा, अशा गोष्टींत मला काही कळत नाहीं. तुला या गोष्टीचे चांगले ज्ञान आहे. शिवाय तुझ्या इतकी मी शिकलेलीही

|