पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुन्हा अटकेची हुकूम आपल्या छावणींत पोहोचले. त्या वेळीं छावणीचा मुख्य कमाल पांचा स्नेही मुफीद लुत्फी हाच होता. अहंमद यांनी कॉन्स्टॉटनोपल येथील मुख्य पोलीस अधिका-यास लिहून कळविले की, ' आपण म्हणतां तो कमाल नाफा बंदरामध्ये आला नाही. तो गाझा येथे आपल्या लष्करी छावणतच आहे असे चवकशीअंती समजते, तरी त्यांना पकडावयास आपण जो हुकूम दिला आहे त्यांत कांहीतरी चूक असली पाहिजे.' मुफीद लुत्फीनेही लिहून कळविले की, 'अहंमद यांचे विधान बरोबर आहे. कमाल येथून सलानिकास कधीही गेले नाहीत. ते माझ्याबरोबरच या छावणीत आहेत.' अहंमद व मुफीद लुत्फी या दोन स्नेह्यांमुळे कमाल यांना नविदान मिळाले. यानंतर कमालनी फार दक्षता घेतली. आपल्यामागे पोलीसांचा ससेमिरा आहे हे जाणून कांहीं दिवस स्तब्ध राहणे इंच कल्याणाचे आहे हे त्यांनी पूर्णपणे ओळखले. जवळ जवळ एक वर्षभर त्यांनी नोकरीवेज बाह्य जगांत लक्ष्य घातलें नाहीं.