पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझा कमालपाशा आदळले; जनतेच्या अंतःकरणांत सुलतानश्या राजवटीविष असंतोष धुमसत असलेला दिसून आला. सलानिकामध्ये येऊन थोडे दिवस होतात न होतात तोच सुलतानाच्या गुप्त हेरांनी त्यांना ओळखले.कमाल यांना ताबडतोब गिरफदार करा असा राजधानहून हुकूम सुटला. सलानिकामधील मुख्य पोलिस अधिकारी जमील हा स्वतन' चा सभासद असल्यामुळे, त्याने सलानिका सोडून जा असा कमाल यांना ताबडतोब निरोप पाठविला. निरोप मिळाल्याबरोबर कमाल यांनी तुर्की सरहद्द ओलांडली व ग्रीसमध्ये प्रवेश केला; तेथून बोटीने जाफाकडे प्रयाण केले. कमाल जाफा बंदरांत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या अटकेचा हुकूम जाफास पोहचला होता. ही वेळ अत्यंत आणीबाणीची होती. या वेळीं कमाल पोलिसांच्या कचाट्यांत सांपडले तर त्यांना देहांत शासन हे ठरलेलेच होते; पण कमाल यांचे दैव बलवत्तर होते.त्यांना पकडण्याचा हुकूम त्यांचे स्नेही अहंमद यांचेच हाती पडला. बोट धक्यास लागल्याबरोबर, अहंमद बोटीवर चढले नि त्यांनी कमाल यांची भेट घेतली. अहंमद यांनी आपल्या बरोबर कमाल यांचा पोषाख आणला होता;तो पोषाख घालावयास देऊन त्यांना गुप्तरीतीने बोटीवरून उतरून घेतले व ताबडतोब शहराबाहेर त्यांची रवानगी केली. तेथून कमाल तडक गाया ये 3