पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुन्हां अटकेचा हुकूम व सुलतानवर तिची अत्यंत भक्त असल्यामुळे तो बेत त्यांना रहीत करावा लागला. बंड पुकारावयास योग्य जागा कुठे मिळेल याची कमाल यांना विवंचना लागून राहिली. इतक्यांत सलानिका मधील त्यांच्या स्नेह्यांनी निरोप पाठवून सलानिकास ताबडतोब निघून या अशी त्यांना विनंती केली.सलानिकामध्ये तर फार असंतोष पसरला होता. त्या ठिकाणी कमाल यांचे अनेक स्नेही असल्यामुळे व ते सर्व वतन' चे सभासद असल्यामुळे सलानिकामधूनच बंडाचा बार उडवून द्यावा असे त्यांनी ठरविले. हे सर्व खरे ! पण सलानिकास जावयाचे कसे ? कमाल सरकारी नोकर असल्यामुळे, त्यांना तेथून हालता येत नव्हते. तथापि कमाल यांच्या धाडसी नजरेला ही अडचण दिसत नव्हती. त्यांनी विश्रांतीकरितां ह्मणून थोड्या दिवसांची रजा घेतली व सलानिकास जाण्याकरितां ते जाफा बंदरावर गेले. त्या बंदरावरचा मुख्य अधिकारी अहंमद हा मुस्तफा कमाल यांचा स्नेही व वतन' चा सभासद् होता. त्याने कमाल यांना मदत करावयाचे आश्वासन दिले. कमाल यांनी आपलें नांवगांव बदललें व व्यापा-याचा वेष घेऊन इजिप्तला जाणा-या आगबोटीत प्रवेश मिळावला. इजिप्तहून । ते अथेन्सला गेले व तेथून सलानिकास पोहोचले. जाफापासून सानिकापर्यंत त्यांना ठिकठिकाणीं गुप्त संस्था, क्रांतिकारकांचे अड्डे ११