पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

======= गाझी कमालपाशा सैन्याने त्यांच्या लहान लहान खेड्यांना आगी लावून व त्यांची शेते उध्वस्त करून दमास्कसकडे कूच केले. दमास्कस येथे आल्यानंतर कमाल यांची त्या ठिकाणी * वतन' ची शाखा सुरू करण्याचे योजिलें. तुरुंगात झालेले हाल किंवा हकी पाशा यांनी दिलेली शेवटची धमकी यांचा काडीमात्र परिणाम त्यांच्या मनावर झाला नाहीं. कुठल्याही प्रकारच्या दमदाटीस न जुमानतां,त्यानी संस्थेची शाखा सुरू करण्याचे निश्चित केले. कॉन्स्टॅटिनोपल प्रमाणे दमास्कस येथील सर्व तरुण लष्करी अधिकारी कमालप्रमाणेच राज्यव्यवस्थेवर असंतुष्ट होते. राज्यव्यवस्थेमध्ये आमुलाग्र क्रांति झाल्याखेरीज तुर्की राष्ट्र सुखी होणार नाही ही कल्पना त्यांना पुरेपूर पटली होती.त्या तरुण अधिका-यांत मुफीद लुत्फी नांवाचा तरुण अधिकारी कमाल यांचा लष्करी शाळेमधील सहाध्यायी होता. त्याने कमालबरोबर सहकार्य करणेची शपथ घेतली. त्या दोघांच्या परिश्रमाने संस्थेचे भराभर सभासद होऊ लागले. थोड्याच अवधींत सिरियामधील सर्व लष्करी ठाण्यातील अधिकारी लोक संस्थेचे सभासद झालेले पाहून, कमाल यांना आनंद झाला, दमास्कस येथूनच क्रांतीचा पुकारा करावा अशी त्यांची फार इच्छा होती. लष्करी अधिका-याचे त्यांना संपूर्ण सहाय्य होते;पण सर्व सामान्य जनतेची तितकी तयारी नसल्यामुळे .