पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुरुगांतून सुटका मनुष्या, तू मनांत आणशील तर सार्वभौम सुलतानांची चाकरी इमानेइतबारे करून आपला उत्कर्ष करून घेशील; पण तू आपल्या नादान कृतीने आपल्या कर्तबगारीस व आपल्या लष्करी बाण्यास काळीमा कावून घेतला आहेस. तू राजकारणांत पडलास व सुलतान यांच्या विरूद्ध असलेल्या बदमाघांच्या टोळक्यांत सांपडलास इतकेच नव्हेतर आपल्या लष्करी स्नेहयासोबत्यांस तू त्या टोळक्यांत ओढून घेतलेस. तुझा गुन्हा अक्षम्य आहे. या गुन्ह्याबद्दल तुला देहांत शासन द्यावयाचे ठरले होते; पण सुलतान यांनी कृपावंत होऊन तुझ्यावर दया दाखविण्याचे योजिले आहे. तुझ्यासासारखा उमदा तरुण वांया जावू नये म्हणून त्यानीं पुन्हां तुला नोकरींत घ्यावयाचे ठरिवले आहे. दमास्कस येथील घोडदलावर अम्मलदार म्हणून तुझी नेमणूक केली आहे. तू या सुवर्णसंधीचा व सुलतानांच्या मेहेनरजरेचा अवश्य फायदा घ्यावास अशी माझी इच्छा आहे. तुझी त्या ठिकाणची कामगिरी पाहून, तुला जास्त बढती देण्याचा विचार करण्यात येईल. तरी आतांपर्यंत केलेला मूर्खपणा विसरून जा आणि आपली नोकरी इमानेइतबारे कर. पण लक्ष्यात ठेव, पुन्हां अशा प्रकारची संधि तुला दिली जाणार नाही किंवा तुला क्षमा केली जाणार नाहीं. तुला हैं माझे शेवटचे सांगणे आहे."