पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा गेल्यानंतर पुन्हां परत ह्मणून आले नाहीत. पण कमाल यांच्याबद्दल सुलतानाच्या मनांत अद्याप इतके किल्मीष निर्माण झाले नव्हते म्हणा किंवा त्यांच्यासारख्या होतकरू व कर्तबगार तरुणाचा आपल्या कार्याकरितां उपयोग करून घ्यावयाचे सुलतानाच्या मनांत होते म्हणा, कमाल यांना त्यांच्या गुन्ह्याची जाणीव करून देण्याकरितां नुसती अंधारकोठडीचीच सजा देण्यात आली. । कमाल यांना ज्या अंधारकोठडीत ठेवण्यात आले ती अत्यंत लहान व दुर्गधीने भरलेली होती. हवा येण्याकरितां अगदी उंचावर एक लहानसा झरोका ठेवण्यांत आला होता. कमाल यांना हा तुरुंगवास अत्यंत असह्य होऊ लागला. आपणास देण्यात आलेल्या शिक्षेचा सूड आपण केव्हां घेऊ असे त्यांना होऊन गेले. जसजसे दिवस लोटू लागले तसतसे ते अधिकाधिक संतापी बनू लागले. कित्येक आठवडे अंधारकोठडीचा पाहुणचार घेत असतां, एक दिवस अचानक त्या अंधारकोठडीचा दरवाजा उघडला गेला. दोन लष्करी अधिका-यांनी कमाल यांना अंधारकोठडीबाहेर काढले व त्यांना जनरल इस्माईल हकी पाशा यांच्यासमोर उभे केले. इस्माईल हकी पाशांनी कमाल यांच्याकडे एकदां तीक्ष्ण दृष्टीने पाहिले. कमाल यांनीही न घाबरतां आपली नजर त्यांच्या नजरेस भिडविली. थोड्या वेळाने जनरल हकी पाशा ह्मणाले, * तरूण