पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा त्याच दिवशी दमास्कसकडे जाणा-या बोटीवर पोलीसांनी कमाल यांनी आणून सोडले. नातेवेळी त्यांना आपल्या मातेला किंवा स्नेह्यासोबत्यांना भेटू देण्यात आले नाहीं. | बोट आस्ते आस्ते निघाली. त्या बोटीकडे एक व्यक्ति निश्चलतेने पहात उभी होती. त्या व्यक्तीने नखशिखांत बुरखा पेहेरला होता. बोट दृष्टिआड झाल्याबरोबर त्या व्यक्तीने हुंदका दिला व धाडकन आपला देह धरणीवर टाकला. तो हुंदका कमाल यांच्या आईखेरीज आणखी कोणाचा असणार ? | | । | ३८