पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ४ थे। । –XX तुरुंगांतून सुटका | >>> सुलतानाच्या धमकावणीस किंवा गुप्त हेरांच्या हेरगिरीस न जुमानतां, कमाल यांनी वतन' ही क्रांतिकारक संस्था चालविण्याचे निश्चित केले. एका अरुंद गल्लीत एक खोली भाड्याने घेऊन त्यांनी त्याठिकाणी * वतन'चे ऑफीस नेले. त्या ऑफीसमधून संस्थेच्या हस्तलिखितांचा प्रसार सभासदांमधून होऊ लागला. त्याठिकाणी संस्थेचे सभासद चोरून येत व वादविवादांत आणि चर्चेत भाग घेत. ती राजद्रोही संस्था चालविणे अत्यंत धोक्याचे होते, तरी ती चालविण्यांत कमाल यांना एक प्रकारचा उत्साह वाटू लागला. ज्याठिकाणी संकट किंवा धोका असेल, त्याठिकाणीं बेगुमानपणे कार्य करीत राहणे कमाल यांना अतिशय आवडू लागले. ते जात्याच निधडे व बेडर असल्यामुळे असल्या धोक्याची त्यांनी केव्हांच पर्वा केली नाही. शिवाय क्रांतिकारक संस्था कशी चालवावी, तिच्या सभासदांचा प्रामाणिकपणा कसाला कसा लावावा, ठराविक खुणांनी कार्य कसे चालुवावे या गोष्टीचे कमाल यांनी चांगले ज्ञान करून घेतले होते.