पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* * * *

  • * • *

- -** ?

  • 41***

=

=

गाशी कमालपाशा सुलतान क्रुद्ध व अस्वस्थ झाला. सैन्यांत उद्या अधिकारी होणा-या या तरुणामध्यें जहाल विचारांची पेरणी व्हावी हे अत्यंत अनिष्ट व घातक आहे असे समजून, त्यानें मिलीटरी ट्रेनिंगचे डायरेक्टर जनरल इस्माइल हकी पाशांना योग्य बंदोबस्त करण्याचा हुकूम दिला.इस्माइल हकी पाशा यांनी त्या कॉलेजच्या मुख्याधिकान्यास कडक ताकीद देऊन, त्या संस्थेच्या सभा कॉलेज आवारांत पुन्हा होणार नाहीत याविषयी खबरदारी घ्यावयास सांगितले. । पण, जबरदस्तीने किंवा धाकदपटशानें क्रांतिकारक विचारांचे निर्मूलन तरूणांच्या मनांतून थोडेच होणार आहे ? बिचारा सुलतान ! त्याला वाटले की, आपण हुकूम सोडतांच हे तरुणांचे बंड मोडून जाईल. | |