पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा | गुप्त हेरांची कमाल व इतर सभासद यांवर कडक नजर होती. ही सर्व मंडळी कशी सांपडतील याचा कसून प्रयत्न त्या हेरांनी चालविला होता. दुर्दैवाने एका गुप्त हेराने या संस्थेमध्ये प्रवेश करून घेतला. या सभासदाचा शपथविध होण्याचा दिवस व वेळ ठरली होती. शपथविधीचा समारंभ चालला असतां पालीसांनी एकदम छापा घालून कमालसह सर्व सभासदांना कैद केलें. ताबडतोब त्या सर्वांची इस्तंबूलमधील सुप्रसिद्ध अशा तांबड्या तुरुंगांत रवानगी झाली. सुलतानविरुद्ध कट केल्याच्या आरोपावरून मुस्तफा कमाल यांची तांबड्या तुरुंगात रवातंगी केली आहे,हे वृत्त ऐकतांच जुबेदा खानम यांना जबरदस्त धक्का बसला. लष्करी अंमलदार होऊन आपल्या कुलाचे नांव करणार असलेल्या आपल्या लाडक्या व एकुलत्या एक मुलावर भयंकर आरोप आलेला पाहून, त्यांचे हृदय फाटले. त्या ताबडतोब कॉन्स्टॅटिनोपल येथे आल्या. कमाल यांना एकदा भेटण्याची संधी मिळावी म्हणून जुबेदा खानम यांनी अतिशय प्रयत्न केले. त्या निरनिराळ्या अधिका-याकडे जात नि त्यांची मनधरणी करीत. दिवसभर त्या वणवण फिरत; पण व्यर्थ ! कमाल यांची भेट होण्याचे सोडुन द्या; पण ते जिवंत आहेत की नाहीं हे। देखील सांगावयास कोणी तयार नसे !