पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

5,5 , क्रांतिकारक तरुण राष्ट्राची प्रगति स्थगित करणा-या मुलामौलवी आणि धर्मपंडीत यांच्या विरुद्ध त्या संस्थेनें रणाशंग फुकले होते. १६६ सुलतानांची नालायख सत्ता नेस्तनाबूद करून त्यो ठिकाणी लोकसत्ताक राज्याची प्रतिष्ठापना करू, सर्व धर्माच्या लोकांना सारखे हक देऊ, मुल्ला आणि मौलवी यांच्या पकडीतून जनतेची मुक्तता केलं' अशी पवित्र कुराणवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतरच कुणालाही संस्थेचा सभासद करून घेण्यांत येई. कमाल यांनी वरीलप्रमाणे शपथ घेतली व त्या संस्थेचे ते सभासद झाले. सभासदांमध्ये ज्या हस्तलिखितांचा गुप्तपणे प्रसार होत असे त्या हस्तलिखितांत कमाल यांचे जळजळीत लेख व कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. संस्थेच्या वादविवादक, मंडळांत त्यांची वक्तृत्वपूर्ण व भावनाप्रधान भाषणे होऊ लागली. कमाल यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा ओघ सुरू झाला की ऐकणारे मंत्रमुग्ध होत. त्यांचे आवेशपूर्ण भाषण सुरू झालें कीं श्रोत्यांच्या अंगावर काटे उभे राहात. त्यावेळी तुर्की तरुणांमध्ये कमाल यांच्या तोडीचा एकही वक्ता नव्हता असे म्हणतात. सुलतानाच्या गुप्तहेरांनी या भयंकर संस्थेचा सुगावा लागला. राजप्रासादांत सुलतानाच्या कानावर ही गोष्ट जातांच