पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाची कमालपाशा त्यो लप्करी कॉलेजमध्ये त्यांच्यासारखेच तरणेबांड व नवविचाराचे लष्करी अधिकारी होते. त्यांच्यामध्ये व कमालमध्ये विचारसाम्यता होती. कमालप्रमाणेच त्या तरुण अधिका-यांनीही आपल्या राष्ट्राच्या अभ्युदयाची तळमळ लागून राहिली होती. परकीय आक्रमणापासून व सुलतानाच्या ऐदी राजकारभारापासून आपल्या राष्ट्राला सोडवून त्याला कर्तत्ववान व स्वावलंबी करण्याची हिंमत त्यांच्या अंतःकरणांत उचल खात होती. • तुर्की राष्ट्राचे आम्हीं घटक आहात आणि आमच्या राष्ट्राला स्वतंत्र करणें हैं। आमचे आद्यकर्तव्य आहे,' असे विचार ते उघड उघड बोलून दाखवीत. कमाल व त्यांचे तरुण सहकारी यांच्या उज्वल ध्येयाबद्दल कॉलेज अधिका-यांची संपूर्ण सहानुभूती होती; पण सुलतानाच्या भीतीने त्यांना उघडपणे मदत करावयास किंवा त्यांचा पुढाकार घेण्यास ते धजत नसत. त्यावेळी कॉलेजमध्ये वतन' नावाची एक गुप्त क्रांतिकारक संस्था होती. या संस्थेमध्ये गुप्तपणे वादविवाद होत असत व संस्थेचे विचार कागदावर लिहून ते प्रत्येक सभासदाकडे हातोहात रवाना होत असत. सुलतानाची जुलमी सत्ता झुगारून देऊन राष्ट्र स्वयंशासित करावयाचे त्यांचे ध्येय होते. त्याचप्रमाणे :