पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झांतिकारक तरुण दिली की, ताबडतोब संशयिताची तुरुंगांत रवानगी व्हावयाला फारसा वेळ लागत नसे. सुलतानाच्या या कृत्यामुळे जनतेमध्ये असंतोषाच्या ज्वाला अधिकच फैलावू लागल्या. राष्ट्राच्या संरक्षणाकरितां आत्मार्पण करु पाहणाच्या तरुणांच्या हातापायांत बेड्या पडतांच राष्ट्राच्या कानाकोपा-यांतून क्रांतीच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या. कमाल यांच्या मनांत लष्करी शिक्षण सोडून देऊन स्वातंत्र्य युद्धांत उडी घ्यावी असे वारंवार येऊ लागले; पण याच लष्करी शिक्षणाचा आपणाला भविष्यकाळी अतिशय उपयोग होईल, असा विचार करून आपला अभ्यासक्रम पूर्ण करावयाचे त्यांनी ठरविले.

  • सिनियर मिलीटरी स्कूलमध्ये ' सर्व परिक्षा चांगल्या रीतीने पास झाल्यावर त्यांची ' जनरल स्टॉफ कॉलेज ' साठी निवडणूक झाली व त्यांना सब-लेफ्टनंटचा हुद्दा मिळाला. • सिनियर मिलीटरी स्कूल' मध्ये अत्यंत बुद्धीमान पण आवरण्यास कठीण असा तरूण अशा त-हेचा शेरा त्यांना मिळाला होता. * जनरल स्टाफ कॉलेजमध्ये जाण्याकरिता त्यांनी कॉन्स्टॅटिनोपलचा-तुर्कस्थानच्या राजधानीचा-रस्ता सुधारला. तेथे गेल्यावर त्यांनी कसून अभ्यास केला आणि तेथील सर्व परिक्षा स्पृहणीयरितीने पास झाल्यानंतर

• त्यांना १९०९ मध्ये कॅप्टन करण्यात आले. $ 5. -

- ---