पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि स्वायत्तता या महान तत्वांचे बजारोपण त्यांच्या अंतःकरणांत झाले, याचवेळीं ग्रीसने तुर्कस्थानविरुद्ध युद्ध पुकारले. ही वेळ अत्यंत आणीबाणीची होती. तुर्कस्थान निःसत्व व कमजोर झालेला पाहून ग्रीसने मोठ्या आवेशाने व हिरीरीने तुर्कस्थानवर झडप घातली. आपले राष्ट्र धोक्यांत आहे असा नवजवान सुकीनीं पुकारा केला. राष्ट्राच्या संरक्षणाकरितां सर्व तरुणांनी संघटणा करावी अशी द्वाही फिरविली. तरुणांचा हा दुर्दम्य उत्साह व देशभक्ति पाहून सुलतानाचे धाबे दणाणले. त्याला वाटले की, राष्ट्रसंरक्षणाच्या निमित्ताने सर्व तरुण तुर्क संघटित होऊन आपले सिंहासन उलथून पाडणार ! त्याने मागचा पुढचा विचार न करतां तरुणांच्या संघटनेची चळवळ दडपून टाकावयास सुरवात केली; सांपडेल त्या संशयित तरुण तुर्कीना तुरुंगात डांबावयाचा उपक्रम सुरू केला. ठिकाठकाणीं गुप्त हेर ठेवण्यांत आले. सुलतानाने सबंध राष्ट्रभर गुप्तहेरांचे इतके जाळे पसरून ठेविले होते की, ज्या ठिकाणी तीन माणसे एकत्र बोलत असतील त्याठिकाणी एकतरी गुप्तहेर तरंगत असावयाचाच. सुलतान या हेराकरितां दरसाल २० लक्ष पौंड खर्च करु लागला. या गुप्तहेरांची बातमी ३८