पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रकरण ३ ३ । -xx क्रांतिकारक तरुण

  • ३५

मोनास्टीरहून सुट्टीमध्ये कमाल सलानिकासे परत आले.आपल्या गांव परत आल्यावर निष्कारण वेळ न दवडता त्यांनी पाद्रीलोकांजवळ फ्रेंच भाषेचा अभ्यास केला. त्याचवेळीं फत्तेही नांवाचा एक उमदा व समवयस्क तरूण त्यांना स्नेही म्हणून लाभला. फत्तेहीचे फ्रेंच भाषेवर चांगले प्रभुत्व होते. कमाल आणि फत्तेही या दोघांनी मिळून व्हॉलटेअर, रूस, हॉब्स, मिल यांचे ग्रंथ अभ्यास पूर्वक वाचून काढले; याखेरीज आणखी कांहीं फ्रेंच ग्रंथांचे उत्कृष्ट परिशीलन केले.वरील ग्रंथकारांचे ग्रंथ जवळ बाळगण्याची सरकारने सक्त बंदी केली होती. त्या बंदीला न जुमानतां कमाल यांनी हे सर्व ग्रंथ आत्मसात केले. त्या ग्रंथांच्या अभ्यासाने त्यांची दृष्टि प्रगल्भ झाली, त्यांचे विचार अधिकच क्रांतिकारक बनले.