पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझो कमालपाशा अधिकारी वर्गांमुळे राष्ट्रामध्ये कसा असंतोष माजला आहे, न्यायाची कशी गळचेपी होत आहे, गरीब प्रजा कशी भरडून निघत आहे, मुल्लामौलवींचे कसे स्तोम माजले आहे याचे भडक व हृदंयविदारक चित्र जनतेपुढे ठेवावयाचे कार्य तरुणांकडून पद्धतशीर चाललेलं होतं. तरुणांच्या या प्रचाराचा परिणाम जनतेवर हाऊं लागला; जिकडे तिकडे सुलतानाबद्दल अप्रीती पसरूं लागली; राज्य व्यवस्थेबद्दल तिटकारा उत्पन्न होऊ लागला; ठिकठिकाणी क्रांतिकारकांचे अड्डे तयार होऊ लागले; बंडाची पूर्वचिन्हें क्षितीजावर दिसू लागली. कमाल यांनी अधाशीपणाने सर्व परिस्थिती न्याहाळून पाहिली; लोकमताचा कानोसा घेतला. कमाल निसर्गतः क्रांतिकारक होते; त्यांचे रक्त उसळी खावू लागले. सुलतानाची नालायख राजवट उलथून टाकण्याचे विचार त्यांच्याही मनांत जोराने उसळी मारू लागले. आपण क्रांतिकारकांचे पुढारी व्हावे, सुलतानाला उखडून टाकून सर्व राष्ट्राची अंतःशुद्धि करावी आणि राष्ट्राचा उद्धारकती म्हणून जगांत किर्ती गाजवावी, अशा उत्तुंग महत्वाकांक्षेने त्यांच्या अंतःकरणांत कायमचे ठाणे दिले. --- ९६