पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लष्करी शाळेत कमाल शेवटच्या वर्गात पोहोचले. या वर्गात पास होऊन वर नंबर आला तरच • सिनीयर मिलिटरी स्कूल ' मध्ये प्रवेश मिळणार होता. सर्वांत वर नंबर मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा चालू ठेवली होती. एखादा विद्यार्थी आपल्यापेक्षां सरस निघतो आहे असे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले तर त्यांना फार वैषम्य वाटे. आपल्यापेक्षां कुणी वरचढ असू नये, असे त्यांना मनापासून वाटत असे. * जगावे तर सर्वांच्या नजरेत भरण्यासारखे जगावे, नाहीतर जगून उपयोग तरी काय, ' अशा महत्वाकांक्षी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर कायम बसला होता.. यावेळीं कमाल यांना १७ वें वर्ष लागले होते. कॅडेट स्कूलमधील शेवटची परिक्षा ते उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन त्यांचा नंबर सर्वांत वर लागला होता. मोनास्टीरमधील ' सिनीयर मिलटरी स्कूलमध्ये त्यांना पाठविण्यात आले. मोनास्टीर हे त्यावेळी तुर्कस्थानमधील राजकारणाचे एक केंद्र समजले जात असे. तुर्कस्थानमध्ये होणा-या चळवळी किंवा जागृती यांचा उगम मोनास्टीरमधूनच प्रथम होत असे. कमाल मोनास्टीर येथे विद्याभ्यासाकारतां गेल्यानंतर सहाजिकच त्यांचे लक्ष नवजवान तरुणांच्या चळवळीकडे गेले. तुर्कस्थानचा सुलतान अबदुल हमीद याच्या नालायख राज्यपद्धति विरुद्ध तरुणांनी प्रचार चालविला होता. ऐदी व लांचखाऊ