पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा कधीही मिळत नसत. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी वर्ग त्यांच्यापासून फटकून वागत असे. आपण जरी विद्याथ्र्यांत मिसळलो नाहीं तरी इतर विद्याथ्र्यांपेक्षा आपण सरस आहोत असे जगाने म्हणावे किंवा चार चौघांत आपला प्रामुख्याने उल्लेख केला जावा असे मात्र त्यांना मनापासून वाटत असे. * मी तुमच्या चारचौघांसारखा राहावा असे मला वाटत नाही. मी कुणी तरी नांव घेण्यासारखे व्हावे, अशी महत्वाकांक्षा आहे " असे विद्यार्थ्यांना स्पष्ट म्हणत. | सर्व लष्करी विषय, विशेषतः गणीतशास्त्र यामध्ये त्यांची बुद्धि कुशाग्र असल्यामुळे, लष्करी शाळेत त्यांनी आपली झपाट्याने प्रगति करून घेतली. कॅप्टन मुस्तफा नांवाच्या एका शिक्षकाचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम असे. त्या शिक्षकाने मुस्तफाना विद्यार्थी-- शिक्षक, म्हणून निवडून काढून त्यांच्या ताब्यांत एक ज्यूनियर क्लास दिला. थोड्याच दिवसांत तर लष्करी शाळेत मुस्तफांचा बोलबाला झाला. मुस्तफांचे असामान्य व्यक्तित्व पाहून त्यांच्या शिक्षकांने त्यांना कमाल, म्हणजे असामान्य असे नांव दिलं. आपणही त्यांना कमाल या नांवानेच संबोधू. लष्करी शाळेतील परिक्षा : भराभर व उत्कृष्ट रीतीने पास होत व त्याचबरोबर मुलांना शिकण्याचे कार्य करित, ३४