पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लष्करी शाळेत अहमद नांवाचा एक नवजवान तरुण रहात होता. तो लष्करी शाळेत असल्यामुळे, सुट्टीत ज्यावेळी घरी येई त्यावेळीं तो लष्करी पोषाखांत वावरे. त्याचा ऐटबाज लप्करी पोषाख, त्याचा तो बाब पाहून, आपणही लष्करी शाळेत जाऊन असाच लष्करी पोशाख करावा,असेच रुबाबाने हिंडावे असे मुस्तफांना वाटू लागले. त्यांना आपण लष्करी शाळेत केव्हा दाखल होऊं असे होऊन गेले.कुणालाही न कळवितां, त्यांनी मेजर क्राद्री नांवाच्या एका रिटायर्ड प्करी अधिका-याला गाठले.हा लाकरी अधिकारी त्यांच्या वडिलांचा स्नेही होता. त्या अधिका-याची विनवणी करून, लप्करी शाळेच्या प्रिन्सिपालजवळ त्याला आपले वजन खर्च करण्यास भाग पाडले. झाले; मुस्तफांना लप्की शाळेत जाण्यापूर्वीच्या चाचणी परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली.सुदैवाने त्या परिक्षेत ते उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले. बिचा-या आईला या सा-या धडपडीचा थांगपत्ताही नव्हता. मुस्तफांच्या बुद्धीला कॅडेट स्कूलमध्येही योग्य वाव मिळाला. बौद्धिक शिक्षणामध्ये त्यांची चालणारी मती अप्रतिहतपणे लप्करी शिक्षणांतही यशस्वी रीतीने मार्ग क्रमू लागली; पण पृवचा एकलकोंडेपणाचा स्वभाव मात्र जशाच तमाच नाहील. त्या लप्करी शाळेत त्यांना मित्र म्हणून कोणी नव्हताच. शाळेतील मुलांशी ते ३३