पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी मुस्तफांना शाळेत न घालतां लष्करी शिपाई बनवावे असे मुस्तफांच्या चुलत्याने जुबेदा खानम यांना सुचविले. त्यावेळी सलानिकामव्ये - मिलीटरी कॅडेट स्कूल ' नांवाची लष्करी शाळा होती. त्या शाळेचा सर्व खर्च तुर्कस्थानच्या सुलतानाकडून होत असल्यामुळे, त्या शाळेत मुस्तफांना घातले तर कांहीही खर्च न येतां मोफत शिक्षण मिळेल.लष्करी शाळेत त्याने आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली तर पुढेमागें मुस्तफा एखादा लष्करी अमलदार होईल. नाहींतर लष्करी शिपाई म्हणून तरी आपले पोट भरेल. तेव्हां त्या लष्करी शाळेतच मुस्तफास पाठवून देणे योग्य व हितावह आहे, असा मुस्तफांच्या चुलत्याने युक्तिवाद मांडला. पण जुबेदा खानम यांना हा युक्तिवाद पटला नाहीं. लप्करांत जाऊन आपला मुलगा हडेलप्पी बनावा हे त्यांना पसंत पडेना. भुलानें धर्मपाडत होऊन किर्ती मिळवावी अशी त्यांची मनीषा होती. त्यावेळी मुल्ला, मौलवी किंवा धर्मपाडत यांची फार कदर होती. खुद्द सुलतान देखील त्यांचा शब्द मोडत नसे. मुस्तफा अशा त-हेचा धर्मपडित झाल्यास आपल्या कुळाचे नांव होईल अशी त्यांची ठाम समजुत असल्यामुळे मुस्तफांना लप्करी शाळेत पाठवावयास त्या तयार नव्हत्या. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुस्तफांना चुलत्याचा सल्ला योग्य वाटला. त्यांच्या शेजारी LIL २३