पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २ रें। -xx लष्करी शाळेत.

  • ६०

जुबेदा खानम यांनी मुस्तफास पुन्हां शाळेत जाण्यास परोपरीने सांगितले; पण त्या शाळेत पाऊल टाकणार नाही असे मुस्तफांनी स्वच्छ उत्तर दिले. शेवटीं धाकदपटशा देऊन पाहिला पण त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. आपल्या लाडक्या मुलाचे पुढील आयुष्य कसे जाणार या विवंचनेत त्या प्रेमळ माऊलीचे रात्रंदिवस जावू लागले. निदान दुस-या शाळेत तरी आपल्या मुलास पाठवावे असा जुबेदा खानम यांनी विचार केला व त्या शाळेचा खर्च सोसण्यास त्यांनी आपल्या बहिणीस विनंती केली. पहिल्या शाळेसच जर मुस्तफा जात असेल तर आपण शिक्षणाचा खर्च सोसू; पण दुस-या शाळेचा खर्च आपण सोसणार नाहीं, असे त्यांच्या बहिणीने स्वच्छ सांगितले,