पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी मनांत मुस्तफाविषयीं राग होता. हा राग काढण्याचा त्या शिक्षकास आयताच मोका मिळाला.

  • मुस्तफाने काय म्हणून त्या विद्याथ्र्यांचे थोबाड फोडलें ? " वर्गात शांतता पसरली * काय कुणीच बोलत नाहीं " शिक्षक कडाडले.
  • माझा निष्कारण अपमान केला म्हणून मीच त्याला मारळे, " मुस्तफांनी बेडर आवाजांत उत्तर दिले.

६ असे काय ? आतां तुला मार खाल्ला पाहिजे "

  • मला मार काय म्हणून ? माझाच अपमान आणि त्याबद्दल मलाच मार. हा निव्वळ अन्याय आहे. मी निष्कारण त्याला मारले असते तर आपले म्हणणे मी योग्य मानले असते "

| 4 ते कांहीं नाहीं. बदला हा मिळालाच पाहिजे, " त्या शिक्षकाने मुस्तफाला घट्ट धरून ठेविले व मुस्तफापेक्षां ताकतवान असणाच्या एका विद्याथ्याकडून मुस्तफांना खरपूस मार देवविला. । मुस्तफा एक शब्दही न बोलतां आपल्या बांकावर जाऊन बसले. वर्ग सुटल्यावर ते निश्चयी मुद्रेने शाळेच्या बाहेर आले व पुन्हां त्या शाळेत पाऊल टाकावयाचे नाही असे ठरवून ते झपाझप पावले टाकीत आपल्या घरी पोहोचले. - ---