पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र्जन्म व बालपण मुस्तफांना अकरावें वर्ष लागले होते. आईने शाळेत घालावयाचा प्रयत्न केला नसता तर मुस्तफा आयुष्यभर शेतकरी होऊन राहिले असते; तुर्कस्थानच्या हिताहिताची पर्वा न करितां चार चौघा शेतक-यांप्रमाणे त्यांनी आपले जीवित कंठीले असते. पण आईच्या प्रयत्नामुळे मुस्तफांच्या नशीबास कलाटणी मिळाली, उत्कर्षाच्या सोपानाचा रस्ता दिसला, आपच्या राष्ट्राचे उद्धार करण्याचे भाग्य त्यांना लाभले. शाळेत गेल्याबरोबर मुस्तफांनी आपल्या बुद्धीमत्तेने वर्ग बंधूंस दिपवून टाकले. अत्यंत हुषार व क्वचितच हसणारा विद्यार्थी ह्मणून त्यांची ख्याती झाली. त्यांचे तेजस्वी डोळे व आत्मविश्वास यामुळे ते पुढेमागे कुणीतरी असाधारण होणार असे भाकित विद्यार्थी वर्ग करूं लागला. आपला कुणी अपमान केला तर तो मुस्तफांना सहन होत नसे. त्या अपमानाचा बदला ते ताबडतोब घेत. एक दिवस एका विद्यार्थ्याने निष्कारण आपला अपमान केला म्हणून मुस्तफांनी त्या विद्यार्थ्यांचे थोबाड रंगविले. हा प्रकार हाफीज नांवाचा शिक्षकानें पाहिला. त्या शिक्षकाचे व मुस्तफांचे बरे नव्हते. आपल्या आवडत्या विषयाबद्दल मुस्तफा उपहास दर्शवितो याबद्दल त्या शिक्षकाच्या