पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा दुर्दैवाने अली रझांना एकाएकी मृत्यु आला. मुस्तफा व त्यांची बहीण मकबुला पोरकी झाली. लाकडाच्या व्यापारात भयंकर नुकसान आल्यामुळे घरामध्ये एक कवडही शिल्लक नव्हती. जुबेदा खानम धैर्यवान होत्या. त्यांनी आल्या संकटास तोंड देण्याचे ठरविले. आपल्या दोघां मुलांस बरोबर घेऊन त्या एका खेड्यांत राहणा-या आपया बंधूदडे निघून गेल्या. ते खेडेगांव असल्यामुळे, त्या ठिकाणी शाळेची व्यवस्था नव्हती. मुस्तफांची शाळा आपोआपच सुटली व मामांच्या घरी गाईचा गोठा साफ करणे, गाईना चारा घालणे व शेळ्या चरावयास नेणे अशी कामे त्यांच्या गळ्यांत पडली. अंगमेहनत व उघडी हवा यामुळे मुस्तफांची प्रकृति कणखर व सशक्त बनली. जसजसे त्यांचे वय वाढत गेले तसतसे ते अधिकाधिक गंभीर व एकलकोंडे बनू लागले. आपला लाडका मुलगा असा वाया जातो आहे असे पाहून जुबेदा खानम यांचे अंतःकरण तीळतीळ तुटू लागले. जन्मभर आपल्या मुलाने गुराखी किंवा कााडकष्ट करणारा शेतकरी म्हणून राहावे ही कल्पना त्यांना असह्य वाटू लागली. जुबेदा खानम यांनी आपल्या एका बहिणीला गळ घालून तिला मुस्तफांच्या शाळेचा खर्च द्यावयास भाग पाडले आणि अशा रीतीने पुन्हां सलानिकांतील शाळेत त्याची रवानगी झाली. यावेळी