पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जन्म व बालपण मुस्तफांस शिकवत असे. शाळेतून घरी आल्यानंतर अली रझा मुस्ताफांना अभ्यासांत मदत करीत. फावल्या वेळांत जुबेदा खानम मुस्तफांना उपदेशाच्या व पराक्रमाच्या अनेक रसभरीत गोष्टी सांगत व ते तन्मयतेने ऐकत. मुस्तफांचे कौटुंबिक जीवन अत्यंत रेखीव व प्रमाणबद्ध असे. घरी आल्याबरोबर वडिलांच्या हाताचे प्रेमाने चुंबन घेऊन अदबीने उभे राहणे व वडिलांची आज्ञा झाल्यानंतरच खाली बसणे, अशा गोष्टींचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. आईबद्दल तर मुस्तफांच्या अंतःकरणांत अनन्यभक्ति होती. वडिलाप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक आदर त्यांना आपल्या आईबद्दल वाटे. मुस्तफांच्या शाळेचा खर्च वाढू लागला. अली रझांना पगार भरपूर मिळत नसल्यामुळे खर्चाची तारांबळ उडू लागली. ते प्रामाणिक असल्यामुळे पगारा खेरीज वर मिळणाच्या पैशास शिवत नसत. शेवटीं अली रझांनी ती नोकरी सोडली व लाकडाचा व्यापार सुरू केला. त्यांचा स्वभाव साधाभोळा असल्याकारणाने व्यापारांत त्यांचा जम बसेना. ते रात्रंदिवस श्रम करीत पण अपेक्षेप्रमाणे प्राप्ती होईना. शेवटी त्या धंद्यांत त्यांना जबरदस्त खोट बसली.