पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा ठरल्यावेळीं एक मुल्ला कांहीं मुलांसह आला व दारासमोर उभा राहून त्याने प्रार्थना म्हटली. मुस्तफांनी त्या मुलाला अभिवादन केले व त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. बाजूस उभे असलेल्या आपल्या मातापित्यांचे चुंबन घेऊन शाळेत जाण्याकरितां घराबाहेर पाय टाकला. मुस्तफांचा हात धरून तो मुल्ला चालला होता व मागून मुलांची फौज चाऊली होती. ते सर्वजण मशिदीत असणा-या। एका शाळेत दाखल झाले, त्या ठिकाणी पुन्हा एकवार प्रार्थना केल्यानंतर मुल्ला मुस्तफांना घेऊन एका वर्गात गेला व आपल्या जवळ बसवून त्याने मुस्तफांना पवित्र कुराणाचा पहिला पाठ दिला. मुस्तफा त्या मुसलमानी शाळेत नियमीत जात असत. बरेच दिवस गेले; पण त्यांची अभ्यासांत प्रगती दिगेना. पुराण्या शिक्षणपद्धतीमुळे त्यांच्या तल्लख बुद्धीला वाव मिळेना, शेवटीं अली रझानी त्यांना त्या शाळेतून काढून इंग्रजी पद्धतीवर चाललेल्या एका खासगी शाळेत घातले. जुबेदा खानम यांना मुस्तफास मुसलमानी शाळेतून काढले याबद्दल प्रथम वाईट वाटले; पण त्या खाजगी शाळेतील शिक्षणाची पद्धत व मुस्तफाच्या अभ्यासांतील प्रगति पाहून झालेला बदल योग्य आहे असे त्यांना वाटले. सुरतफांची दुशाग्र बुद्धि पाहून त्या शाळेच्या शिक्षकास अत्यंत आनंद वाटे व तो मोठ्या उत्साहाने १६