पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जन्म व बालपण आदर्श बनवून टाकावा, अशा उच्च व सुखद् आकांक्षानी त्यांचे हृदय कंपित होत असे. अली रझांच्या त्या उच्च आकांक्षा खन्या होणार असे उद्गार मुस्तफा यांच्याकडे पाहून कुणीही काढले असते. सर्वसाधारण मुलांपेक्षां कांहीं तरी निराळे व्याक्तित्व मुस्तफा यांच्या अंगीं होते. त्यांच्या पाणीदार व तेजस्वी डोळ्यांकडे पाहील्यानंतर ते कुणीतरी अद्वितीय होणार असे कुणालाही वाटे. एवढ्या लहान वयांत मुस्तफा यांची वृती गंभीर असे. ते सहसा मुलांमधे खेळत नसत. आपल्या कपड्यांची व्यवस्था टापटीप ठेवत. मळलेला पोषाख त्याना खपत नसे. अजागळ व बेडौल तुर्की पोषाखाचा त्यांना तिटकारा वाटे. त्यांचे कपडे नव्या पद्धतीने व व्यवस्थित शिवलेले असत. पेहेराव व आचार विचारांत मुस्तफांनी आपल्या वडिलांचा कित्ता आपल्या समोर ठेवला होता. मुस्तफा कमाऊ यांना ७ वें वर्ष लागले. त्यांना शाळेत घालावयाचा दिवस उजाडला मुलास शाळेत घालावयाचे झाले म्हणजे तुर्की मुसलमान एक विशिष्टं रिवाज पाळीत. त्या रिवाजाप्रमाणे त्यांचे लहानसे घर त्यादिवशीं लतापल्लवांनी शृंगारित केले होते. मुस्तफांच्या आईने मुस्तफांना न्हावू घालून त्यांच्या अंगावर पांढरा शुभ्र पोषाख चढविला व सोनेरी काठांचा फेटा बांधला. १५ ।