पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी अन्यायी, अजागळ व बुरसटलेल्या मनोवृतीचा खलीफा यामध्ये तुलना करतांना ते निराशेचे सुस्कारे टाकत. पाश्चात्य राष्ट्रे आपली प्रगति किती झपाट्याने करून घेत आहे, किती संपन्न व बलवान होत आहेत याची माहिती ते न चुकतां वर्तमानपत्रांत वाचीत. त्याबरोबरच आपल्या राष्ट्रांत मुल्ला मौलवींकडून होत असलेली सुधारणांची गळचेपी, प्रगतीची कुचंबणा व नवविचारांची अवहेलना ते व्यथित अंतःकरणाने पहात व तुकच्या भीषण भवितव्याविषयीं तासचे तास विचार करीत बसत.

  • आपले वय झाले. आपल्या हातून आपल्या देशबांधवांची काय सेवा घडणार ? अधःपाताच्या धारेस लागलेल्या आपल्या राष्ट्राचे संरक्षण आपल्या हातून कसे होणार ?'

इतक्यांत त्यांच्या लाडक्या मुलाची आठवण होई. मुस्तफांची आठवण झाल्याबरोबर त्यांचा निराशावाद मावळून जाई, त्यांचा चेहरा प्रफुल्लित होई, त्यांच्या डोळ्यांत निश्चयाचे तेज चमकू लागे. आपल्या लाडक्या मुस्तफास उत्कृष्ट शिक्षण द्यावे, त्याला जर्मनीस पाठवून तज्ज्ञ करावा आणि लाखों तुर्कचा