पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जन्म व बालपण त्यांचा जन्म शेतकरी दाँत झाल्यामुळे त्यांचे हाडपेर मजबूत । होते. त्यांचा बांधा डौलदार व उंच होता; डोळे घारे व टपोरे होते. त्या वृत्तीने अत्यंत धार्मिक व जुन्या वळणाच्या होत्या; तल्लख बुद्धी व अचुक निर्णय देण्याची वृत्ती यामुळे त्यांची विलक्षण छाप पडे. अली रझा हैं मुस्तफा यांच्या वडिलांचे नांव. ते सलानिका बंदरांत कस्टम अधिकारी होते. त्यांचा स्वभाव शांत, सरळ व प्रामाणिक होता. त्यांच्या बरोबरचे इतर नोकर व अधिकारी लांचलुचपत घेत; पण अली रझा यांनी आपल्या सबंध हयातीत लांच इहणून एक छदामही कुणाकडून घेतला नाहीं. पवित्र कुराणच्या आज्ञेप्रमाणे, ' लांच देणे हा महाभयंकर गुन्हा आहे' असे ते मानीत. इलामचा आधारस्तंभ म्हणविणा-या खलीफाच्या राज्यांत हा गुन्हा सर्रास व बिनधोकपणे चालत आहे हे पाहून त्यांना खलीफाच्यासुलतानाच्या राज्यपद्धतीची कीव वाटत असे. । लांचलुचपती बरोबर खलीफाच्या राज्यात घडत असलेले इतर अक्षम्य व अनन्वित प्रकार पाहून त्यांना अत्यंत खेद होई. पूर्वीचे ते प्रजाहित तत्पर, न्यायी व थोर अंतःकरणाचे खलीफा आणि आतांचा हा प्रजेच्या हिताविषयीं उदासीन राहणारा ॐ

==