पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा घरांत माणसांची हालचाल आहे किंवा नाही याचा थांगपत्ता देखील शेजा-याला लागत नसे. रस्त्यावरही तशीच निस्तब्ध शांतता. कधी कधी लहान मुळे रस्त्यावर खेळत असतां किंवा एखादा म्हातारा खोकत घराबाहेर उभा असतां काय ती रस्त्यावरची शांतता भंग व्हावयाची ! बायकांत गोषाची चाल अत्यंत कडक असल्यामुळे घराबाहेर स्त्री म्हणून दिसावयाची नाहीं. अगदी नाईलाज झाला तरच पाणी आणण्याकरितां म्हणून एकादी स्त्री तोंडावर बुरखा घेऊन व फक्त एकच डोळा उघडा ठेवून, झपाझप पावले टाकीत, तलावाकडे जात असलेली दिसत असे. अशाच चोवीस तास पडद्यांत राहणा-या व बाह्य जगांशी संपर्क नसणाच्या आईच्यापोटी मुस्तफांनीं जन्म घेतला. त्यांच्या आईचे नांव जुबेदा खानम, मुस्तफांना जन्म दिला त्यावेळी त्यांचे दय तीस वर्षांचे होते. पण वयाच्या ७ व्या वर्षापासूनच त्यांना गोपांत ठेवण्यात आले होते. आपल्या घराबाहेर त्या सहसा जात नसत. घरातील मंडळी व शेजारच्या बागकांशीच फक्त चार शब्द बोलत. त्यांना लिहीतां वाचत अजिबात येत नसे आणि आपल्या घराबाहेर काय जग आहे याची त्यांना कल्पना देखील नव्हती. पण आपल्या कुटुंबांतील मंडळीवर त्यांचे जबरदस्त वजन असे. त्यांचा शब्द मोडण्याची कोणाच्याही अंगांत हिंमत नव्हती,