पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १ लें


XX

जन्म व बालपण १ ० तुर्कस्थानच्या इतिहासांत सन १८८१ हे भाग्यशाली साल ठरले. यासालीं तुर्कस्थानचा उद्धार करणारा महाभाग जन्मास आला. या महाभागाचे नांव, आईबापांनी मोठ्या प्रेमाने मुस्तफा असे ठेविले. याच मुस्तकांना, पुढे सारे जग गाझी कमालपाशा या नांवाने ओळखू लागले. सलानिका शहरांतील एक जुनाट किल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका माडेक्यातोडक्या घरांत मुस्तफांचा जन्म झाला. आणि ते घरही किती अरुंद बोळांत आणि किती अव्यवस्थित; हवा किंवा प्रकाश येण्याकरितां धड खिडकी ना झरोका; एखादा असलाच तर तो जाड जाळीने व्यापलेला. घराचे दार तर सदैव बंद केलेले असावयाचे. तेच वर काय, पण त्या मोहल्यांतील सर्व तुर्की लोकांची घरे त्या नमुन्याचच.