पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा । ग्रहण लागले. पुढील ३०० वर्षांत तुकीचा पराक्रम दिवसेंदिवस निष्प्रभ होऊ लागला, त्यांच्या औदार्याचा ओघ अनाठायीं वाहू लागला, ऐषआराम व पोकळ बडेजाव यांमध्ये आपली कर्तबगारी समाविष्ट झाली आहे असे त्यांना वाटू लागले. राजकारण नालायव व ऐदी लोकांच्या हाती गेले, जुन्या व बुरसलेल्या विचारांच्या मुलामौलवींचा पगडा दिवसेंदिवस अधिकाधिक बसू लागला. | आणि या सर्व अनिष्ट गोष्टींचा परिणाम व्हावयाचा तोच झाला. सहा वर्षांची आयुमर्यादा गांठलेल्या तुर्की साम्राज्याची शकले उडालीं; सहिया, रुमानिया, बल्गेरीया, ग्रीस वगैरे युरोपांतील राष्ट्रे आणि इजिप्त, इराण, इराक, सीरीया अरबस्तान वगैरे आशियांतील राष्ट्रं तुर्की साम्राज्यांतून फुटून निघाली. ज्या राष्ट्रांना तुर्कीनी एकेकाळी गुलाम करून टाकले होते, त्याच राष्ट्रांच्या पायाशी लोळण घेण्याचा दुर्धर प्रसंग तुकवर ओढवला! इतकेच नव्हे तर, युरोपांतील ख्रिश्चन राष्ट्रांच्या कारस्थानास बळी पडून जगांतील आपले अस्तित्व गमावून बसण्याची पाळी आली. | अशा दुर्धर प्रसंगी नष्टप्राय झालेल्या आपल्या तुर्क राष्ट्राचा, अपमानित झालेल्या आपल्या मातृभूमीचा, अधोगतीस गेलेल्या आपल्या देशाचा, उद्धार करणारा महापुरुष निर्माण झाला. या महापुरुषाचे नांव गाझो कमालपाशा. ---