पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाई। कमलपोशी

  • 12.

जनतेच्या मनावर चढलेली रुढ आचारविचारांची पुटे फोडून काढतांना कमालपाशांना केवढे पारश्रम पडले असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी ! यापुढेही जाऊन कालपाशांनीं धार्मिक परंपरा व रूढी यांच्यावर जो जबरदस्त हल्ला चढविला तो तर इतिहासांत अमर होऊन राहण्यासारखा आहे. धार्मिक कपना व रूढी जनतेच्या हाडीमासीं खिळया असता, त्याविरुद्ध मोहीम सुरू करून कमालपाशांनी आपल्या कर्तृत्वमंदीरावर कळस चढविला आहे. प्रचलित धार्मिक भावनाविरुद्ध ज्याठिकाणी ब्र काढण्याची सोय नव्हती, त्याठिकाणी त्या भावना आमूलाग्र बदलण्याचे धाडस कमालपाशांनी आपला प्राण पणाला लावून करून दाखविले आहे. राजकीय परिवर्तनापेक्षा सामाजिक व धार्मिक परिवर्तन करण्यांत जास्त धैर्य, धडाडी व निश्चय लागतो, अशी इतिहास आपणांस साक्ष देत आहे. राजकीय, सामाजिक व धार्मिक क्रांति एकाचवेळी करून दाखविणारी जगांतील असामान्य विभूति म्हणून कमालपाशांचा इतिहासकारांना उल्लेख करावा लागेल.

  • मृत्युशय्येवर पडलेल्या युरोपांतील आजारी तुर्कस्थानास उठवून बसवून त्याला आरोग्यपूर्ण

३१९