पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असामान्य भिभूत तारुण्याच्या उत्साहाने पळावयास व आनंदाने गावयास लावण्याचा कमालपाशांनी चमत्कार करून दाखविला आहे....कुठल्याही देशांतील एकादा तरी माणूस आपल्या आयुष्याच्या अल्पशा काळांत इतकी आमूलाग्र क्रांति करण्याची नुसती आशा तरी दाखवू शकेल काय ? हा प्रश्न अत्यंत विचारार्ह आहे! आणि त्याचे उत्तर हेच की, जर कुणी मनुष्य असे कार्य करू शकेल तर तो मुस्ताफा । कमालपाशा होय." x एका सुप्रसिद्ध पाश्चात्य लेखकाच्या वरील स्पष्ट व सडेतोड विचारावरून व कमालपाशांच्या जीवनक्रमावरून जगांमध्ये कमालपाशा ही एक असामान्य विभूती होऊन गेली असे म्हणावयास कांहीं प्रत्यवाय आहे काय ? x " Great Contemporaries ", by Arnold Troynbee, Page 288-298. स मा प्त