पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असामान्य विभूती मनोरचनेत मुसोलिनीनें क्रांति केली तिची तुलना । कमालपाशांनीं तुर्कस्थानामध्ये अत्यंत शांततेने केलेल्या क्रांतीशी कधीही करता येणार नाहीं....अवघ्या ११ वर्षांच्या काळांत कमालपाशांनी आपल्या राष्ट्रास ६०० वर्षे पुढे नेले आहे. " x जगांतील मोठमोठ्या राष्ट्रधुरोगांना नुसत्या राजकीय परििस्थतीशी झगडावे लागले; पण कमालपाशांना राजकीय, सामाजिक व धार्मिक अशा त्रिविध पारिस्थतीला तोंड द्यावे लागले. स्थानिक राजकीय झगडा एवढे एकच कार्य इतर राष्ट्धुरीणांनी केले; पण कमालपाशांना स्थानिक राजकीय परिस्थितीशी झगडावे लागलेच; शिवाय तसे करीत असतांना तुर्कस्थानावर अकस्मात हल्ला करणाच्या बाहेरील शत्रूशीही त्यांना तोंड द्यावे लागले. सामथ्य, सहाय्य व सामुग्री तुटपुंजी असतां कमालपाशांनी अंतर्गत व बाहेरील शत्रूवर जो विजय मिळविला तो तर जति अभूतपूर्व समजला जाईल. त्याचप्रमाणे जनतेच्या सामाजिक आचारविचारांत क्रांति करण्याचे दुर्मिळ श्रेय कमालपाशांनी मिळविले आहे. अडाणी x " Secrets of Kemal Pasha's success" by Michael Lorant. 84